शरद पवारांचा अमित शाहंबद्दल मोठा गौप्यस्फोट, तडीपारीच्या वेळी काय घडलं? थेट सगळा घटनाक्रमच सांगितला…

पुणे : रविवारी शिर्डी येथे भाजपाचे अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केले, असे अमित शाह शिर्डीतील अधिवेशनात म्हणाले होते.
आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
शरद पवार यांनी अमित शाहंचा तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला. पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली. उद्धव ठाकरे सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचं मत सांगतील. मला हे माहीत आहे, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता.
तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील, असे शरद पवार म्हणाले. पण दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेलं बरं. असेही शरद पवार म्हणाले.
यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. येणाऱ्या काळात यावरून मोठे शाब्दिक युद्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठ्या जागा जिंकून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. यामुळे त्यांचे सरकार स्थापन झाले आहे.