पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या बैठकीनंतरच!! देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट…

मुंबई : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन मोठा धक्का दिला होता. त्यांचे सरकार टिकले नाही. पण याची मोठी चर्चा झाली.

विठुराया पाऊस पडू दे, प्रत्येकाला चांगले दिवस येऊ दे..!! मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलं साकडं..
आता यावरच देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बैठक घेतल्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाल्याचा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे.

यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता शरद पवार यांच्या संमतीने अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती.
दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेपासून वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी..
असे असताना मात्र अजित पवार यांच्यासोबत शपथ घेण्याच्या चार दिवस आधी त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे नियोजन पुढे आमलात आणता आल नसल्याचाही दावा फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
यामुळे सगळं नियोजन फिस्कटले. उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी नाते तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी बोलणी सुरू केली होती. त्यांनी आमचा फोनही उचलणे बंद केले होते.
दरम्यान, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक स्थिर सराकर देण्यासाठी आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचे समजले. त्यानुसार शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यात राज्यात सरकार बनवण्याचे ठरवण्यात आले.