Sharad Pawar : शरद पवार लोकसभेसाठी आज जाहीर करणार आपल्या पक्षाची पहिली यादी, कोणत्या मतदार संघातून कोणाला उमेदवारी? जाणून घ्या…

Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच पक्षांनी तिकीट नाकारल्याने नाराज नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
अशातच आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार] पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत १० जागा मिळण्याची शक्यता आहे.
त्यात बारामती, शिरुर, अहमदनगर आणि दिंडोरीसह भिवंडी मतदारसंघाचा समावेश आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवारांची यादी घोषित करतील. महाविकास आघाडीत ठाकरे गटानं १७ उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे. Sharad Pawar
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आज उमेदवारी जाहीर करणार असून बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच आज वर्धा लोकसभेच्या उमेदवाराबाबत देखील निर्णय होण्याची देखील दाट शक्यता आहे. पवार गटाकडून अद्याप माढा, बीड, रावेर, सातारा, वर्धा, लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही.