Sharad Pawar : लढाई एकतर्फी नाही!! बारामतीत रखरखत्या उन्हात शरद पवार यांचे जंगी स्वागत, उंडवडी, सुप्यात लक्षणीत उपस्थिती…

Sharad Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत सध्या सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. एकाच घरात ही लढत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले आहे. शरद पवार यांची साथ अनेकांनी सोडल्याने ते एकटे पडले असताना मात्र त्यांचे गावोगावी जोरदार स्वागत केले जात आहे.

आज शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील जिरायती भागाचा दौरा केला. यावेळी गावागावात फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांची तसेच तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
बारामती तालुक्यातील उंडवडी, कारखेल, देऊळगाव रसाळ आदि गावात शरद पवार यांनी दौरा केला. तसेच दुष्काळी परिस्थितीची पाहणी देखील त्यांनी केली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. Sharad Pawar

यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही लढत वाटते तेवढी सोपी नाही. यामुळे या लढतीत नेमक काका जिंकणार की पुतण्या जिंकणार याकडे सर्वांचे लागले आहे. शरद पवार यांनी सध्या बारामती लोकसभा मतदार संघात फिरायला सुरुवात केली आहे.
बारामती, दौंड इत्यादी याठिकाणी सध्या ते दौरे करत आहेत. सुप्रिया सुळे यांनी देखील याठिकाणी तळ ठोकला आहे. याठिकाणी तरुण आणि टोपी पायजमा घालणारे लोकं उपस्थित होते. यामुळे अजूनही ही लढत एकतर्फी नसल्याचे दिसून येत आहे.