Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप! मोठ्या उद्योगपतीच्या घरी शरद पवार- भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बैठक..

Sharad Pawar : गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे.

या पाठोपाठ उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार का? अशी चर्चा रंगली आहे.
सध्या राजकारणात पडद्याआडून महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अर्थनीतीमुळे लोकप्रिय असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्याने भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला भाजपविरोधात सशक्तपणे लढणाऱ्या महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Sharad Pawar

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातील नेत्यांसह इतरही दिग्गज नेत्यांनी ६ जनपथ निवासस्थानी गर्दी केली होती. महाराष्ट्राची उदात्त राजकीय संस्कृती साक्षीला ठेवून इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच गुरुवारी रात्री अदानी यांच्या घरी भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली आहे.
उभय नेत्यांच्या भेटीत मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याबाबत चर्चा केली तसेच आगामी काळातील पक्षाच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकांवरही चर्चा झाल्याची मागिती आहे. सत्तावाटपात योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही भाजप नेत्याने राष्ट्रवादीला दिली आहे.
