Sharad Pawar : बीड लोकसभेला पंकजा मुंडे यांची वाटचाल खडतर, शरद पवारांनी टाकला डाव, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघाचा दौरा करण्यास सुरवात केली आहे.

भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने त्या पंकजा मुंडे यांनी केवळ आनंदच व्यक्त केला नव्हता, तर यावेळी धनंजय मुंडे देखील महायुतीत असल्याने आपला विजय हा प्रीतम मुंडे यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मताधिक्याने होईल असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते.
मात्र आता हळूहळू त्यांचा मार्ग खडतर होताना दिसतो आहे, कारण बीडच्या रणांगणात महाविकास आघाडी तगडे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना बीडच्या रणांगणातून उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. Sharad Pawar

मेटे यांच्या समर्थकांनीही या संदर्भातील संकेत दिले असून ज्योती मेटे यांना आग्रह केला आहे. ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची निवडणूक लढवावी असे आवाहन बीडमध्ये शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केले आहे.
विनायक मेटे हयात असताना ते भाजपा बरोबर होते, मात्र भाजपने वेळोवेळी सातत्याने त्यांच्यावर अन्याय केला. विधानपरिषद निवडणुकांमध्ये मेटे यांना डावलले असा आरोप देखील कार्यकर्त्यांनी करत ज्योती मेटे यांना महाविकास आघाडी कडून यावेळची निवडणूक लढवावी असा आग्रह केला आहे.
दरम्यान,ज्योती मेटे यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्वीकारला तर बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशी तगडी लढत होईल. अर्थात ज्योती मेटे नेमका निर्णय काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.