Sharad Pawar : इंदापूरमध्ये एका माणसाला मी तिकीट दिलं, आमदार केलं, मंत्री केलं! पण आता…; शरद पवारांचे मोठे वक्तव्य…


Sharad Pawar : इंदापुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांसोबत गेलेले आमदार भरणे यांच्यावर जोरदार टीका केली.

शरद पवार म्हणाले, इथं आपण एकाला निवडून आणलं तिकीट दिलं मंत्री केलं पण त्यांनी काम केलं नाही. त्यांनी वैयक्तिक फायदा केला, यामुळे त्यांना बाजूला करा, उद्याच्या लोकसभा निवडणुकीत याबाबत तुम्ही निर्णय घ्या. देशात सुप्रिया सुळे यांचे काम आहे, संसदेत पहिल्या दोन खासदाराच्यात त्या आहेत.

यामुळे तुतारी लक्षात ठेवा, चिन्ह नवीन आहे सगळीकडे पोहोचवा . तसेच ते म्हणाले, ज्यांचा सहकारी संस्थेत चांगला लौकिक आहे, असे आप्पासाहेब जगदाळे आपल्याकडे आले आहेत. देशात लोकसभा निवडणुक आहे.

यावेळी लोकांची मनस्थिती वेगळी आहे, काल मी सातारला होतो, शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरला तेव्हा वीस हजार लोक उन्हात उभे होते, हेच चित्र सगळीकडे आहे, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, अस चित्र आहे. Sharad Pawar

बारामतीत मोदींनी सांगितले की माझं बोट धरुन ते राजकारणात आलेत. त्यांनी २०१४ ला पेट्रोल ५० टक्के किमती कमी करू असे सांगितले होते, झाले का? इथं आया बहिणी आहेत सिलेंडर ४०० ला होता आज ११०० ला झाला. २ कोटी रोजगार देतो म्हणाले आज काय झालं काम आहेत का?

नोट बंदी केली म्हणाले १५ लाख देतो पण १५ रुपये पण आले नाहीत. झारखंड च्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकल दिल्ली च्या मुख्यमंत्र्यांना आत टाकलं. भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना ते आपल्याकडे घेतात. अनेक मंत्र्यांना आत टाकतात. आज आप्पासाहेब यांनी चांगला निर्णय घेतला मी स्वागत करतो, त्यांनी काही मागितले नाही, त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी ते बांधण्यासाठी २ एकर जमीन देतो असे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!