शरद पवार म्हणजे हाताचं ठेंगा आहेत! त्यांची आघाडी म्हणजे वज्रमूत, ठाकरे गटाच्या आमदाराची जीभ घसरली..


सातारा : शिवसेना शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणजे वज्रमूठ नाही. तर वज्रमूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचं ठेंगा आहेत.

तसेच संजय राऊत म्हणजे करंगळी आहेत. आपण त्या बोटाचे संकेत कधी देतो तुम्हाला तर माहितीच आहे, असे ते म्हणाले. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महेश शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मधले बोट आहेत. त्यांच्या शेजारील २ बोटे म्हणजे अजित पवार आणि नाना पटोले आहेत. सातार्‍यातील शिवतीर्थ येथे पोवई नाक्यावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता महाविकास आघाडीतील नेते त्यांच्यावर काय टीका करणार हे लवकरच समजेल.

दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!