पुण्यातील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला वसंत मोरे यांची भेट; चर्चांना उधाण
Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशातच पुण्यातील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला वसंत मोरे यांनी आज दुपारी भेट दिली आहे.
त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील माध्यमांसमोर दिली आहे. आपल्याला शरद पवार साहेबांनी भेटायला बोलवलं होतं, त्यामुळे आपण येथे आलो असे वसंत मोरे म्हणाले आहे.
त्याचबरोबर लोकसभेची जर उमेदवारी मिळाली तर ते शरद पवार गटात प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. पत्रकारांशी वसंत मोरे यांनी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले, तुर्तास आपण पक्ष प्रवेश करत नसून ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं मोरे म्हणालेत.
यामुळे त्यांची काय भूमिका आहे ही त्यांनी गुलदस्तात ठेवली आहे. त्याचबरोबर वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
Views:
[jp_post_view]