Sharad Pawar : मोठी बातमी! बिश्रोई गॅंगच्या टार्गेटवर आता पवार गटाचा बडा नेता? धक्कादायक माहिती आली समोर…


Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, त्यातल्या तीन गोल्या सिद्दीकी यांना लागल्याला तर एक गोळी त्यांच्यासोबत असलेल्या इसमाला लागली.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली आहे. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बिश्नोई गँगच्या धाडसामुळे महाराष्ट्रात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, आता या गँगच्या लक्ष्यावर जितेंद्र आव्हाड यांचे नाव देखील आले आहे.

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी काही महिन्यांपूर्वी फोनवरून धमकी मिळाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर धोका असल्याची चर्चा सुरू आहे. बाबासिद्दीकींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या संदर्भात पोलिस ठाण्यात धाव घेत आव्हाडांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्याची मागणी करत आहेत. Sharad Pawar

यावर प्रतिक्रिया देताना, आव्हाड यांच्या समर्थकांनी म्हटले की, जर आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ केली गेली नाही, तर आंदोलन करण्यात येईल. त्यांनी पोलिस प्रशासनाला लक्षात आणून दिले की, आव्हाड हे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नाच्या उंबरठ्यावर आहे, आणि या पाश्र्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता या सगळ्या घटनांचा परिणाम सरकारवर काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!