Sharad Pawar : शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले, माझ्या सुप्रियाला एक पद नाही दिलं पण…

Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातव्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य केले.
बारामतीमधील कन्हेरी गावात युगेंद्र पवार यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी जनतेला संबोधीत करताना अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच कालच्या सभेत शरद पवारांनी जोरदार टीका केली होती. यालाच शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे मी अनेकांना संधी दिली. मंत्री केले, आमदार केले, खासदार केले. गेली अनेक काळ पक्षात मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. पण काहींनी सत्ता नाही म्हणून साथ सोडायची भूमिका घेतली.
काहींनी पहाटे शपथ घेण्याचा उद्योग केला. राज्यपालांना कशाला पहाटे उठवायचं? चार महिन्यांनी पद मिळालेच असते की, पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असते का? घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांच्या घरफोडीच्या आरोपाला उत्तर दिले. Sharad Pawar
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने नोकरी करावी, अशी माझी भूमिका असते. आम्ही लोकांनी सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरली, लोकांचे हित पाहिले. गांधी नेहरू शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालायचे ठरवले.
अजितदादांना चार वेळा उपमुख्यमंत्री केले. पण पाचव्या वेळी भाजपच्या साथीने जाऊन शपथ घेण्याचे कारण काय होते? असा सवाल करून सुप्रियाला पदे दिली नाहीत पण अजितदादांना सर्व दिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.