अजित पवारांसोबत गुप्त बैठकीतला ‘हा’ मुद्दा शरद पवारांनी मान्य केला असता तर, राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंपच झाला असता…


पुणे : अजित पवार आणि शरद पवार या्ंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीवर शिवसेना हा राष्ट्रवादीचा मित्र पक्ष नाराज झाला असल्याचं, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून आलं आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात जी गुप्त बैठक झाली, त्या बैठकीविषयी अनेक तर्क राजकीय क्षेत्रात लावले जात आहेत. जोपर्यंत शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत येत नाहीत, तोपर्यंत अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही, अशी अट भाजपाकडून अजित पवार यांच्यासमोर ठेवली गेली, असा दावा, वडेट्टीवार यांनी केला आहे.

पण त्याही पुढे आज सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं, याचे आणखी वेगळे मुद्दे समोर आलेले आहेत.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर गुप्त बैठकीत जे मुद्दे ठेवले आहेत, ते शरद पवार यांना पटलेले नाहीत. यानंतर शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं जात आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना सांगितले होते की, तुम्ही तटस्थ राहा.निवृत्ती घ्या. वेगळा ग्रुप म्हणून लढू नका.

कारण शिवसेनेची जी अवस्था सध्या होत आहे, ती राष्ट्रवादीची होणार नाही हे कशावरुन?, पक्ष एकसंध राखण्याची गरज आहे, कोर्ट केसेस सध्या तरी आपल्याला परवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे हा सल्ला स्वीकारा, असा सल्ला अजित पवार गटाने शरद पवार यांना दिला आहे.

मात्र शरद पवार यांनी अजित पवार यांचे हे म्हणणं फेटाळून लावले आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी देखील म्हटले आहे, शरद पवार साहेबांनी आमच्यासोबत यावं, असं आम्ही त्यांना साकडं घातले आहे.

तसेच तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार हे जर मविआसोबत भविष्यात आले नाहीत, तर आमच्या प्लान ए आणि प्लान बी मात्र तयार असणार आहे. ही भूमिका आमच्यासाठी निवडणूक लढवण्याची आणि रणनीतीची गरज आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी शिवसेनेकडून कुठे कुठे उमेदवार दिले जातील, याची चाचपणी सुरु केली आहे. दुसरीकडे पवार कन्या सुप्रिया सुळे यांनी नात्यातला ओलावा आणि राजकारणातील संबंध यांची सरमिसळ करु नका, असं माध्यमांना म्हटले होतं, पण ही गुप्त भेट झाली नाही, असे राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाने नाकारलेले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!