शहाजीबापू पाटील यांचा ‘टप्प्यात कार्यक्रम करू’ ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केला निश्चय…!


सांगोला : सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा निश्चय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस तथा माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वासू समर्थक अरुण आसबे यांनी केला आहे.

झाले असे कि, दोन दिवसांपूर्वी सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या शेळवे (भाळवणी) या भागात दोन विद्युत ट्रान्सफार्मरचे उद्घाटन केले. वस्तुस्थिती अशी आहे की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस अरुण आसबे यांनी 16/3/2022 रोजी महाविकास आघाडी मधील तात्कालीन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील शेळवे, खेडभाळवणी, उपरी या गावातील अतिरिक्त भार असणाऱ्या ठिकाणी व आवश्यक असणाऱ्या ठिकाणी सात डीपींची मागणी केली होती.

बापूंनी थेट केले उद्घाटन :
ट्रान्सफार्मरसाठी पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक लोकांना अंधारात ठेवून ट्रान्सफार्मरच्या कामाचे उद्घाटन आ. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शेळवे गावात दणक्यात झाले. ट्रान्सफार्मरच्या कामाच्या उद्घाटनाचे फोटो व माहिती आ. शहाजीबापू पाटील यांच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रसारित करण्यात आली.

या कामात सुरुवातीपासून पाठपुरावा करणाऱ्या अरुण आसबे यांनी एका व्हिडिओद्वारे आ. शहाजीबापू पाटील यांच्या या कृतीचा निषेध केला. त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहेत.

टप्प्यात कार्यक्रम करू:
आगामी विधानसभा निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. आ. शहाजीबापू पाटील यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सहकार्य केलेले त्यांचे सहकारीही त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील यांचा “टप्प्यात कार्यक्रम करू ” असा खणखणीत इशारा अरुण आसबे यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!