धक्कादायक! लोणीकंद येथील मनोरा हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ तरुणींची सुटका, दोघा मॅनेजरांना अटक..
पुणे : तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणार्या लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तेथून सहा तरुणींची सुटका केली आहे. तसेच तेथील दोघा मॅनेजरांना अटक केली आहे.
प्रज्योत हिरीआण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९, रा. पेरणे फाटा) अशी अटक केलेल्या मॅनेजरांची नावे आहेत. हा प्रकार लोणीकंदमधील हॉटेल मनोरा येथे सुरु होता.
तसेच येथून २० वर्षाच्या बांगला देशीय तरुणीसह हिंजवडी, कोलकत्ता येथील ६ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागातील रेश्मा कंक यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, हॉटेल मनोरा येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती फ्रिडम फर्मच्या सदस्यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.
त्यानंतर तेथे छापा टाकला. त्यात हॉटेलमध्ये ६ तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. मॅनेजर ग्राहकाकडून दीड हजार रुपये घेत असत. त्यातील एक हजार रुपये दोघे वाटून घेऊन तरुणींना पाचशे रुपये देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांना दोघा मॅनेजरांना अटक केली आहे.