खळबळजनक! बिअर बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ची फाईल, नेमकं प्रकरण काय?


नागपूर : नागपुरात एका बियर बारमध्ये चक्क शासकीय फाईल घेऊन तीन व्यक्ती बसून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुट्टीच्या दिवशी दुपारी बारमध्ये बसून तीन व्यक्तींनी शासकीय फायलींचा गठ्ठा उघडून, दारूच्या घोटांसोबत त्या फायलींवर सह्या केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मनीष नगर येथील एका बारमध्ये दुपारच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते आहे. त्यातील एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायलींना पडताळताना व्हिडिओत दिसतोय.

महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले ‘हे’ अधिकारी नेमके कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बीअर बारमध्ये चक्क ‘शासन’ सुरू केल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जात आहे. तर व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रसिद्ध बीअर बारमध्ये दुपारी ३.३० च्या सुमारास आलेल्या तिघांनी टेबलवर सरकारी फायलींचा गठ्ठा ठेवत बारमध्येच ‘शासन कारभार’ सुरू केला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, यातील एकजण दारूचे घोट घेत फायलींवर सह्या करताना दिसतो आहे.

या प्रकारामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत – हे अधिकारी कोण होते? कोणत्या विभागाशी संबंधित होते? आणि बारमध्ये नेमकं कोणत्या महत्वाच्या फायलींची पडताळणी सुरू होती? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!