दुःखद! जेष्ठ कवी ना. धो. मनोहर यांचे पुण्यात निधन, मराठी साहित्य विश्वावर शोककळा..

पुणे : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उद्या पळसखेड यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे हे महानोरांचं छोटेसे गाव. पळसखेडची लोकगीते त्यांनी जिव्हाळ्याने संकलित केली. ‘पळसखेडची गाणी’ त्यांनी आईला अर्पण केली. महानोरांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर गेली ६० हून जास्त वर्षे कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.
महानोरांचा जन्म पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले.
शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामे केली.