पुण्यातील’ या ‘ कामांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट ; तोडगा निघणार?


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुरंदर विमानतळाचा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असुन यासाठी शेतकरी, ग्रामस्थ,नागरिक यांनी काही मागण्या राष्ट्रपतीकडे केल्या आहेत. त्यानंतर या प्रकरणी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीं देखील भेट घेतली. या विमानतळासाठी राज्य सरकार शेतकऱ्याकडून भूसंपादन घेत असल तरी त्या बदल्यात मिळणारा मोबदला कमी असल्याच त्यांनी म्हणणं मांडल आहे.आता या पुरंदर विमानतळ मोबदला प्रश्नी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर विमानतळासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून भूसंपादन करत आहे. मात्र हे भूसंपादन करत असताना मिळणारा आर्थिक परतावा हा कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे. त्यामुळे काल साखर संकुलात या बाधित शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यावर पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी यावर चर्चा केली. त्यानंतर आता या संदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांनी काही आक्षेप घेतले आहेत. या प्रकल्पामुळे अत्यंत सुपीक व सिंचनाखालील कृषी जमीन नष्ट होणार आहे. त्याचबरोबर कऱ्हा नदी, तलाव,वृक्षसंपदा व जैवविविधतेवर गंभीर धोका निर्माण होणार आहे. राज्य सरकार सातत्याने हा प्रकल्प जबरदस्तीने आम्हावर लादण्याचा प्रयत्न करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!