कर्नाटकात कॉंग्रेसची 42 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर….!

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरवात केली आहेत. बुधवारी झालेल्या काँग्रेस च्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आणखीन ४२ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी आतापर्यंत १६४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. गुरुवारी आणखी ४२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, काँग्रेसनं भाजप आणि जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या ३ जणांना तिकीट दिले आहे .यासोबतच जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार श्रीनिवास यांना गुब्बीमधून ंिरगणात उतरवण्यात आलंय. कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे.