Accident News : भरधाव वेगात स्कॉर्पिओची खांबाला जोरादार धडक; चार ठार, दोन जखमी
उत्तर प्रदेश : भरधाव वेगात स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओची खांबाला जोरात धडक झाली. या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
संगीता रस्तोगी, आशिका रस्तोगी (१९ वर्षे) यश रस्तोगी (२६ वर्षे) आरती रस्तोगी (४५ वर्षे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडूनहून बरेलीच्या दिशेने स्कॉर्पिओ जात होती. यातून एकाच कुटुंबातील ६ जण प्रवास करत होते. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. स्कॉर्पिओची खांबाला इतकी भीषण धडक झाली की यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.अपघातात तीन महिला, एक पुरुषासह चौघांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चालक आणि एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.