महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ८ आणि ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी, जाणून घ्या कारण…

पुणे : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे.
राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे. या दोन दिवसांच्या आंदोलनात राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटणार आहेत. त्यामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
या दोन दिवसांच्या आंदोलनात राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटणार आहेत. त्यामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
गेल्या वर्षभरात सरकारकडून वारंवार आश्वासनं देण्यात आली, मात्र अनुदानाचा टप्पा, वेतनवाढ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या अद्यापही तसंच आहेत. २०२४ मध्ये सलग ७५ दिवस राज्यभर आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर बैठकही झाली आणि काही निर्णय जाहीर झाले. पण १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निघालेल्या GR मध्ये अनुदानाचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
दरमयान, या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.