मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळांना पुढील 5 दिवस सुट्टी, नेमकं कारण काय?


पुणे : विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची माहिती अशी आहे की राज्यातील शाळांना पुढील 5 दिवस सुट्टी आहे. मकरसंक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.

याचबरोबर मतदान केंद्र असलेल्या शाळा आणि कार्यालयांना देखील सुट्टी दिली आहे. शाळा 14 जानेवारीपासून सुट्टीसाठी बंद राहतील आणि पुढील सोमवारी म्हणजेच 19 जानेवारी रोजी पुन्हा सुरू होतील. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्यामुळे ही सुट्टी सुरू होत आहे.

त्यानंतर 15 आणि 16 जानेवारीला महापालिका निवडणुका आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शाळांना या काळात सुट्टी देण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, याशिवाय सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना निवडणुकीसाठी ड्युटी लागली आहे. महापालिका भागातील अनेक शिक्षक मतदान प्रक्रियेत सहभागी असतील त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानासाठी ज्या शाळांमध्ये केंद्र स्थापन केले गेले आहे, त्या इमारतींमधील कामकाज 14 आणि 15 जानेवारीला बंद ठेवले जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!