Savitri Thakur : मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्र्याला लिहिता येईना, कार्यक्रमात घातला घोळ, बेटी पढाओ, बेटी बचाओ लिहिताना केली मोठी चूक…

Savitri Thakur : केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा नीट लिहिता आली नाही. त्यांनी लिहिले – बेढी पडाओ, बच्चाव. ठाकूर मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच नीट लिहिता आली नाही. केंद्रीय मंत्र्यांना चार शब्दांची घोषणादेखील अचूक लिहिता न आल्याचा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं यावरुन मंत्र्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नेमकं घडलं काय?
धार जिल्ह्यातील ब्रह्मा कुंडीस्थित सरकारी शाळेत १८ जूनला ‘स्कूल चलो अभियाना’च्या अंतर्गत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून धार लोकसभेच्या खासदार सावित्री ठाकूर यांना बोलावण्यात आलं होतं. Savitri Thakur
त्या मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास खात्याच्या राज्यमंत्री आहेत. व्हिडीओमध्ये सावित्री ठाकूर पांढऱ्या फळ्यावर देवनागरीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची घोषणा चुकीच्या पद्धतीनं लिहिताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. के मिश्रा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
‘घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींना आणि मोठ्या विभागांची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना त्यांचीच मातृभाषा येत नाही. ही माणसं त्यांचं मंत्रालय कसं चालवू शकतात?,’ असा सवाल मिश्रांनी उपस्थित केला.