गौतमी पाटीलला सातारा न्यायालयाने दिला आदेश; नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप…!


पुणे : प्रसिद्ध ‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा न्यायालयाने दिले आहेत. गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी महाराष्ट्रालील गावागावांतील सर्वच तरुणांना भूरळ घातली आहे. पण दुसरीकडे गौतमीच्या नृत्याने काही महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. लावणी ही लोककला आहे. लोककलेत अश्लिलता येत नाही. लावणीकडे बघण्याचा समाजातील महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी, लावणी सादर करताना त्यात अश्लीलपणा करू नये, असे म्हणत तिच्यावर अनेकदा टीका करण्यात आली आहे.

तरुणाईमध्ये तिची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. मध्यंतरी गौतमीच्या एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!