संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची प्रस्थान तारीख ठरली…!
पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार आहे. यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होणार आहे. 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील.
पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी अजित महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे उपस्थित होते.
तसेच परतीचा प्रवास सोमवार 3 जुलै थोरल्या पादुका येथे अभंग आरती होऊन वाखरी येथे मुक्कामी राहिल. मंगळवार 4 जुलै रोजी महाळुंगे, बुधवार 5 जुलै रोजी वडापूरी, गुरूवार 6 जुलै रोजी लासुर्णे, शुक्रवार 7 जुलै रोजी बऱ्हाणपूर येथे येईल.
तसेच शनिवार 8 जुलै रोजी हिंगणीगाडा, रविवार 9 जुलै वरवंड, सोमवार 10 जुलै उऱूळी कांचन, मंगळावार 11 जुलै रोजी नवी पेठ पुणे, बुधवार 12 जुलैला पिंपरी गाव, गुरूवार 13 जुलैला देहूगाव श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात पालखी असा असणार आहे.