Sanjay Raut : आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार!! संजय राऊतांनी थेट दिवसच सांगितला..

Sanjay Raut : काल महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचेमतदान पार पडलं आहे. शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांनी भाष्य केले आहे. २३ तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील.

एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठरवू नये. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल सत्य झाले हा तपासाचा भाग आहे. प्रचंड पैसे त्यांनी वाटले आहेत. तरी सुध्दा ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अभिमानावर लढलेली आहे. पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता लोकांनी मतदान केलं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, आजच गौतम अदानींवर वॉरंट निघाले आहे. महाराष्ट्र अदाणीला विकायला निघालेला आहे. ट्रंप सरकारने अदाणी विरोधात वॉरंट काढल आहे. धारावी, एअरपोर्ट अनेक टेंडर आहेत. त्यातही गौतम अदाणीने, संगनमत करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सुध्दा ट्रंप प्रशासनाप्रमाणे कारवाई करू म्हणून आम्हाला पाडण्याचा प्रयत्न झाला, असं संजय राऊत म्हणाले आहे. Sanjay Raut

दरम्यान, महाविकास आघाडीला लोक कौल देणार आहेत. त्यातून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. नाना पटोले मुख्यमंत्री बनणार असतील. तर राहुल गांधींनी, सोनिया गांधी, प्रियंका गांधींनी घोषणा केली पाहिजे. अदानीमुळे देशाला डाग लागला आहे.
महाराष्ट्रात जी लढाई झाली ती अदानी राष्ट्र बनू नये म्हणून ही लढाई सुरु आहे. निवडणूकीत २००० हजार कोटींपेक्षा जास्त अदानींनी आले आहेत. ट्रंप सरकारने गौतम अदानी विरोधात अश्यामुळेच अरेस्ट वॉरंट काढले आहेत. आम्ही १०० पेक्षा जास्त अरेस्ट वॉरंट काढू, असं संजय राऊत म्हणाले आहे.