Sanjay Raut : मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोनाने घेतली चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्रांची भेट, राऊतांकडून फोटो पोस्ट..


Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्वयंघोषित नेता मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्हवेळी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. अशातच आता संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप केला आहे.

मॉरीस नरोना हा चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेला होता. शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. सध्या महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत. पक्षात प्रवेश देत आहेत. Sanjay Raut

गृहमंत्री अदृश्य झाले असून राज्य गुंडांच्या तावडीत आहे. त्यामुळे त्यांना कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. एवढेच नाही तर संजय राऊत यांनी मॉरिस आणि एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले, असा दावा राऊत केला आहे.

दरम्यान, यापूर्वी राऊत यांनी राज्य सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत. पक्षात प्रवेश देत आहेत. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत.

राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!