Sanjay Raut : वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार का? संजय राऊतांनी जे ठरलंय तेच सांगून टाकलं….

Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यानं वसंत मोरे यांनी वंचितकडून पुण्यात निवडणूक लढवली. लोकसभेला पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी ते मातोश्री वर भेट घेण्यासाठी येणार असून वसंत मोरेंबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.
वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेशासाठी इच्छुक असून ते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. याआधी वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारीसंदर्भात संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण तेव्हा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. Sanjay Raut

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या भेटीबद्दल बोलताना म्हटलं की, भेट घेऊ द्या काय हरकत आहे. ते कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे.
त्यांनी लोकसभा लढवली पुण्यात. त्याचे सामाजिक राजकीय कार्य चांगले आहे. आज दुपारी ते उद्धव ठाकरे साहेबांना भेटत आहेत हे खरं आहे आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील हे देखील तितकच खरं आहे.