Sanjay Raut : आमच्या हातात ईडी, सीबीआय येईल तेव्हा त्यांचा पक्ष…, संजय राऊत यांचा भाजपला थेट इशारा
Sanjay Raut : लोहा लोहे को काटता हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे. आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल अशा शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी परिवार वादावरून जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्र देताना संजय राऊत यांनी त्यांना थेट सुनावले आहे. ते म्हणाले, ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावे.
त्यावेळी भारतीय जनता पक्ष शिल्लक राहिला नसेल.लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे. फक्त त्यांनाच माहित आहे असं नव्हे. ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा” असं संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut
दरम्यान,यावेळी राऊत यांनी भाजपवार कडाडून हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार पार्टी आहे. भ्रष्टाचाराला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचारी काम करणारी पार्टी, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार, अशी टीका राऊत यांनी केली आहे.