Sangli Accident : ब्रेकिंग! दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांवर काळाची झडप, एकाचा मृत्यू, तिघे जखमी.
Sangli Accident : मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली आहे. एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, तिकडे सांगलीच्या शिवसैनिकांचा मोठा अपघात झाला. Sangli Accident
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळी ही घटना घडली एक भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला मागून धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत. शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती आहे. Sangli Accident
दरम्यान, मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात अर्थात शिवतीर्थवर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.