Samruddhi Highway : मोठी बातमी! समृद्धी महामार्ग तब्बल ५ दिवस राहणार बंद, असा असेल पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Samruddhi Highway पुणे : तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण पाच दिवस तीन तासांसाठी समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
जालना ते छत्रपती संभाजी नगर समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्च दाबवाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पाच दिवस तीन तासांसाठी समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली आहे. Samruddhi Highway
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चता वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी, जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
सोबतच दुसऱ्या टप्प्यात २५ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३ यावेळात बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी ही माहिती दिली आहे.
या कालावधीत पर्यायी मार्ग कोणता?
नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सावंगी इंटरचेंज- जालना महामार्गावरून विरुद्ध दिशेने निधोना-जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे वळवण्यात येणार आहे.
तसेच इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने प्रवासी जाऊ शकतात.