मोठी बातमी! संभाजीनगर -पुणे महामार्गावर बसची कारला धडक; एक ठार, पाच जखमी..


पुणे : संभाजीनगर पुणे महामार्गावर अपघाताची मालीका सुरु असून भरधाव वेगातील बसने कारला मागूण जोराची धडक दिल्याने कारमधील एक जण जागीच ठार झाला तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना लिंबेजळगाव (ता.गंगापूर) जवळील लवकर पुलाशेजारी रविवारी (ता.१७) रात्री १२ च्या सुमारास घडली.

सय्यद जावेद सय्यद हनीफ (वय.३३) रा.देऊळगाव, ता. देऊळगावराजा जिल्हा.बुलढाणा असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेख वसीम शेख (वय .30 वर्ष रा. देऊळगाव मही) दानिश खान रियाज खान (वय, ३० वर्ष रा.देऊळगाव मही) शेख इसाक शेख गुलाम (वय. २८ वर्ष. रा. देऊळगाव मही) शेख समीर शेख नजीर (वय. २७ वर्ष रा..देऊळगाव मही) शेख कलीम शेख रहीम (वय.३२ वर्ष. रा. देऊळगाव मही.ता. देऊळगावराजा जिल्हा.बुलढाणा) असे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मिळलेल्या माहिती नुसार, नगरकडुन संभाजीनगराकडे रात्री साडे अकराच्या सुमारास MH 28, AZ5786 सुझुकी ब्रेझा कार जात असतांना पाठीमागुन भरधाव वेगात असलेल्या, बस MH 12 VF 4034 शिवाई इलेक्ट्रीक बस ही ब्रेझा गाडीवर धडकल्याने ब्रेझा गाडीतील तरुण ठार झाला तर कारमधील पाच जण जखमी झाले आहेत.

अपघात होताच शेजारील हाँटेलचालकांनी पोलीसांना कळवले, ग्रामस्थ व पोलीसांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटना महामार्गावर घडल्याने काही वेळ रस्ता जाम झाला होता.

दरम्यान, पोलीसांनी नागरीकांच्या मदतीने रस्ता मोकळा केला. याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात बसचालक विरुद्ध गुन्हा नोदकरण्यात आला व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सखाराम दीलवाले करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!