जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला….


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान, सलमान खान सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. सलमान आणि त्याच्या नावाभोवती असणारं वादाचं वलय सर्वज्ञात आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलमानेने आत्तापर्यंत कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता सलमान खानने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. धमकीबाबत सलमानने थेट उत्तरे दिली नाहीत .पण तो असे काही बोलला ज्यामुळे त्याच्या चाहते वर्गाला धक्का बसला आहे.

 

 

 

 

दरम्यान ,पत्रकार परिषदेत सलमानला प्रश्न विचारण्यात आला की, आपण अवघ्या देशाचे भाईजान म्हणून ओळखले जाता, मग ज्या धमक्या तुम्हाला मिळाल्या त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की मी, सगळ्यांचाच भाई नाही, काही लोकांचा ‘भाई’…तर काही लोकांचा ‘जान’ आहे. हे उत्तर देत सलमानने मिळणाऱ्या धमक्यांवर प्रत्यक्ष उत्तर देणे टाळले.

 

 

 

 

सलमानच्या येणाऱ्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. शिवाय सलमानकडे ‘किक 2’, ‘टायगर 3’ यांनसारखे चित्रपट आहेतच, जे लागोपाठ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!