Sagarnana Chaudhary : एका वर्षात अत्याधुनिक प्लँन्ट, सभासद व कामगारांची देणी फेडून कारखाना सुरू करु – सागरनाना चौधरी


Sagarnana Chaudhary उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही फक्त घराणेशाहीची परंपरा म्हणून पुढे चालविण्यासाठी लादली गेली आहे. वास्तविक विरोधी पॅनेलच्या घराण्यांतील पिढ्यांनी हा कारखाना अर्थिक अडचणी आणण्याचे काम केले आहे. तेच आता कारखान्याचे तारणहार बनू पाहत आहे. मात्र सभासदही या लोकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही , सत्ता दिल्यास राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून एका वर्षाच्या आतच आत्याधुनिक प्लॅन्ट ने परिपूर्ण असा कारखाना सुरू करुन थकित शेतकरी व कामगारांच्या देणी देण्याचा निर्णय आम्ही सार्थ करुन दाखवू असा विश्वास सोरतापवाडीचे माजी सरपंच सागरनाना चौधरी यांनी गावभेट दौऱ्यात व्यक्त केला आहे.

यशवंत कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या गट क्र.दोन मधील उमेदवार शशिकांत चौधरी, विजय चौधरी व ताराचंद कोलते यांच्या सह पॅनेलच्या प्रचारासाठी सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगावमूळ,शिंदवणे, वळती तरडे , आळंदी म्हातोबा या गावांतील शेतकरी सभासदांच्या गावभेटी दौऱ्यात त्यांनी पॅनेलचा जाहिरनामा बोलून दाखविला. या गावभेट दौऱ्यात पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर व हवेली पंचायत समितीचे  माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्यासह सागर चौधरी यांनी सभासदांना साद घातली.

सागर चौधरी म्हणाले, निवडणूक लागल्यानंतर केवळ कारखाना सुरू होणे हा दृष्टीकोन समोरच्या पॅनेलच्या लोकांकडून येणे अपेक्षित होता. मात्र त्यांना कारखाना चालू करण्याऐवजी त्यांची दुसरी पिढी कारखान्यात कशी शिरेल हे प्रयत्न केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षांचे राजकीय वैर विसरून गेले आहे. Sagarnana Chaudhary

या उलट आमच्या पॅनेल प्रमुख न्यायालयात जाऊन कारखान्याच्या निवडणुकीसाठी संघर्ष केला, बाजार समिती तालुक्याची केली. आम्ही कारखाना निवडणुकीची वर्गणी भरली पण वेळ आल्यावर त्यांनी फक्त आपल्या घराण्यातील लोकं पाठविण्यासाठी स्वार्थ दाखवून बिनविरोधचा प्रस्ताव धुडकावला. परंतु आम्ही सर्वांनी प्रस्थापितांना जनतेच्या दरबारातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही स्वच्छ, प्रामाणिक व भ्रष्टाचाराचा डाग नसलेले व जनतेच्या प्रश्नांसाठी ताळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

सभासदांनी संधी दिल्यास एक अत्याधुनिक प्लॅन्ट उभारण्याचा तसेच कारखान्यावर इथेनॉल ,डिस्टलरी व सहवीज निर्मिती प्लॅन्ट उभारुन एका वर्षांत कारखाना उभा करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी लागणारी केंद्र व राज्य सरकारची मदत सत्तेतून करणारआहे. कारखाना सुरू करण्यासहीत सभासद व कामगारांची देणी देण्यात प्राधान्य देणार असल्याचे सागर चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान या कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या या गटात पॅनेलला भरघोस पाठिंबा सभासदांनी गावागावी दिला आहे. सभासदांनी पॅनेलकडून जाहिरनाम्यावर समाधान व्यक्त करीत असून बाजार समिती , कारखान्यासाठी संघर्ष करणाऱ्या या पॅनेलला सभासदांत निर्णायक प्रतिसाद मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!