सदाशिव पेठ तरूणी हल्ला प्रकरण! पोलीस हवालदारांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई…

पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील सदाशिव पेठेत एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून जखमी केले होते.

तसेच, या घटनावेळी तरुणीसोबत उपस्थित असणाऱ्या त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून हाताच्या अंगठ्याला दुखापत केली होती. यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.


असे असताना आता विश्रामबाग पोलीस ठाणे अंकित येणाऱ्या पेरूगेट पोलीस चौकीतील पोलीस हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची निर्दोष मुक्तता
याबाबतचे आदेश परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी जारी केले. याबाबत पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट? त्या एका फोनमुळे उडाली खळबळ
परंतु पेरूगेट पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना चौकीतील हे तीन पोलिस कर्मचारी कामाच्या ठिकाणावरून गैरहजर होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
