Rupali Chakankar : खासदार सुप्रिया सुळेंनी बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी केली अन् रुपाली चाकणकर संतापल्या, नेमकं काय घडलं?


Rupali Chakankar : बोपदेव घाटात मागील आठवड्यात एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराचं प्रकरण चर्चेत असतानाच आता यावरुन राजकीय टीका होताना दिसत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि स्वत: शरद पवार मंगळवारी बोपदेव घाटात ज्या ठिकाणी हा दुर्देवी प्रकार घडला तिथे जाऊन पहाणी करुन आले.

त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी पुण्यासह राज्यात घडत असलेल्या घटनांबाबत रोष व्यक्त केला आहे, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संबंधित घटना घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले असं म्हणत सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. Rupali Chakankar

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

बोरदेव घाटात घडलेल्या संबंधित घटनेला घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून १२ टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी??? आपल्या माहितीसाठी,चंद्रपुरमध्ये कोरपना येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे ,पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत,यांच्याविरोधात आंदोलन,पत्रकार परिषद कधी घेणार? झोपी गेलेल्याला जाग करता येत, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे, असं म्हणत रूपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पहाणी..

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटात जाऊन पोलिसांकडून नेमकं काय घडलं याची पहाणी केली. या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी काही फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना सुप्रिया सुळेंनी, “बारामती लोकसभा मतदार संघातील बोपदेव घाटाला आदरणीय पवार साहेबांच्या सोबत भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. काही दिवसापूर्वी या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले, अशी कॅप्शन दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!