भर पावसात विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर रोहित पवारांचे आंदोलन, अजित पवार म्हणाले…


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कर्जत जामखेडच्या एमआयडीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज आंदोलन केले आहे. एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनी हे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे. रोहित पवारांनी एकट्याने त्यांच्या कर मतदारसंघासाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

विधानभवनाच्या प्रांगणातच रोहित पवारांनी त्यांच्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांची भेट देखील घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी हा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक दिवसांपासून रोहित पवार या मुद्द्याचा पाठपुरवठा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की हे असे आंदोलन करणे योग्य नाही.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी सभागृहाने एकमताने पुतळ्याजवळ आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले.

रोहित पवारांनी त्यांचे जे काही म्हणणे आहे, जो काही प्रश्न आहे तो सभागृहात येऊन मांडावा असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!