रोहित पवारांच्या अडचणी वाढणार; कोकाटेंनी बजावली मानहानीची नोटीस, आठ दिवसात माफी मागण्याचा इशारा नाहीतर…


पुणे: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मानहानीची नोटीस बजावली असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसांत सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली नाही तर, मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा कोकोटेंनी रोहित पवारांना पाठविलेल्या नोटिशीमध्ये दिला आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत तत्कालीन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केल्यानं खळबळ उडाली होती. या वादानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कृषिमंत्रीपद काढून घेत क्रीडा खाते सोपविले होते. आता या प्रकरणात मानहानी झाल्याचे सांगत कोकाटे यांनी पवारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांना या अडचणींना समोर जावं लागणार आहे. मात्र या नोटिसीला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देखील दिल आहे.

नोटिसीला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती, तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रति असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही,’ असे सांगून पुरावे सादर करण्याचा इशाराच पवार यांनी दिला

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!