रोहित पवारांकडून अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा यांचे कौतुक, कारण काय..?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जय शाह यांचे आभार मानले आहेत. रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अमित शाह यांच्या भाजपामध्ये वैचारिक मतभिन्नता आहे.
जय शाह हे अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. सध्या जय शाह बीसीसीआयचे सचिव आहेत. रोहित पवार यांनी जय शाह यांचं कौतुककेले, तसेच त्यांचे आभार मानलेत, यामागे कुठलं राजकीय कारण नाहीय. रोहित पवार आणि जय शाह यांना जोडणारा दुवा आहे, क्रिकेट. यंदा वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा भारतात होणार आहे.
५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. पुण्यातही वनडे वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. पुण्यात तब्बल २७ वर्षानंतर वर्ल्ड कपचे पाच सामने होणार आहेत. यासाठी रोहित पवार यांनी जय शाह यांचे आभार मानलते. रोहित पवार यांनी टि्वटमध्ये माझे मित्र म्हणत जय शाह यांचं कौतुककेले आहे