Rohit Pawar : सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी अजितदादांवर कोणाचा दबाव?, रोहित पवारांचे मोठे विधान…


Rohit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजयीत सामना झाला होता. त्यात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यभर दौरे करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली मी बहिणी विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होते. मात्र पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे तो माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन मला सांगते की तसं व्हायला नको होतं. असं अजित पवार म्हणाले आहेत. यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती.

त्यांच्यावर दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता असं रोहित पवार यांनी म्हटलंय. लोकसभेनंतर आता विधानसभेलाही त्यांच्यावर दबाव असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. Rohit Pawar

आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलं. तसंच राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल असा वादाही रोहित पवार यांनी अजितदादांना दिला.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील.

पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!