Rohit Pawar : मोठी बातमी! अजितदादा गटाचे २२ आमदार संपर्कात, शरद पवार घेणार अंतिम निर्णय, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….


Rohit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार की, काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवार गटाच्या १८०-१९ आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मात्र शरद पवार त्यातल्या १० ते १२ आमदारांनाच घेतील असंही रोहित पवार म्हणाले आहेत. भाजप अजित पवार गटाला फक्त १० जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल असंही रोहित पवार म्हणाले आहेत. Rohit Pawar

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जयंत पाटील विधीमंडळात होते, त्यावेळी अजित पवार गटाचे काही आमदार तिथे जाऊन त्यांना भेटल्याच्या चर्चा होत्या.

त्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, जयंत पाटील खूप अनुभवी नेते आहेत. त्यामुळे कसं, कधी, कोणतं कार्ड बाहेर काढायचं? हे त्यांना खूप चांगले माहीत आहे. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे.

पुढे बघा काय होतंय. शरद पवार तर, राजकारणात, महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षाही फार पुढे आहेत हे लोकसभा निवडणुकांमध्ये साहेबांनी दाखवून दिलंच आहे. विधानसभेत तर ते आणखी जास्त दाखवतील.

त्यामुळे शरद पवार आणि त्यांना जोडीला जयंत पाटील, इतर आमच्यासारखे कार्यकर्त्यांचंही स्वागत आहे. पण ज्या लोकांनी अतिपणा केला. कुठेतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले. अशा लोकांबाबत साहेब आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!