ब्रेकिंग! रिक्षाचालकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर एका रिक्षा चालकानं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. पण या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असल्यानं पुढील अनर्थ टळल्याचं सांगितलं जात आहे.
विनय पांडे असे या रिक्षाचालक नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान ठाण्यातील लुईसवाडी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर महापालिकेच्या सफाई करणाऱ्या दोन मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री ठाण्यातून रवाना झाले.
पण त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान विनय पांडे हा रिक्षाचालक मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ आला आणि त्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
पण इथं कायचं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो त्यामुळं पोलिसांनी वेळेत या रिक्षाचालकाला अडवल्यानं पुढील अनर्थ टळला. नंतर या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दरम्यान, आरटीओनं त्याला रिक्षाचा नवीन परवाना देण्यास नकार दिल्याने हताश होऊन या रिक्षाचालकाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.