महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल प्रश्नाच्या मुळाशी! महसूलचे धोरण बदलाचे संकेत स्वागतार्य, न्यूज पोर्टलच्या बातमीची थेट दखल..


जयदीप जाधव                                              उरुळीकांचन : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात विधानसभवात ‘जनता दरबार’ कार्यक्रम भरवून महसूल विभागाचा बदलांसदर्भात सकारात्मक पाऊले उचलली आहे. महसूल विभागाचा कारभारात सातत्याने सुरू असलेल्या अपप्रवृत्तींना रोखण्यासहीत कारभाराची प्रतिमा सुधारण्यासाठी पुणे विभागातील महसूल अधिकाऱ्यांना इशारा दिल्याने महसूलमंत्र्यांच्या या धोरणाचे स्वागत करण्यात येत आहे. महसूल कारभार गतिमान व लोकाभिमुख करण्याचा त्यांच्या प्रयत्नांची महसूल विभागाने अंमलबजावणी करावी अशी माफक अपेक्षा सामान्य स्तरावरुन होत आहे.

 

‘द टाईम टू टाईम न्यूज’ या न्यूज पोर्ठलने महायुती सरकार ०३ चे नव्याने सूत्रे स्विकारलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महसूलच्या बदलत्या धोरणांवर लक्ष घालणार का ? महसूल अधिकाऱ्यांना कालबध्द कार्यक्रम देणार काय ? म्हणून धोरणांवर वृत्त दिले होते. त्यानुसार महसूलमंत्र्यांनी महसूल अधिकाऱ्यांना प्रतिमा सुधाण्यासह १०० दिवसांचा कालबाह्य कार्यक्रम हाती घेऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावे अशा इशारावजा सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी विधानभवनात महसूल कामकाजाच्या बदलांचे थेट सूचना महसूल अधिकारी यांना महसूलमंत्र्यांनी गांभीर्याने दिल्या आहेत.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमंत्रीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शुक्रवारी(दि. १०) रोजी पुण्यात विधानभवनात ‘जनता दरबार’ उपक्रम आयोजित केला होता.या उपक्रमाला उपस्थिती नगण्य असली तरी भविष्यात आशा उपक्रमाला सामान्य नागरीक अधिक उत्स्फुर्तपणे संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या जनता दरबाराने महसूलची कार्यपद्धता बदलणार म्हणून महसूलमंत्र्याकडून अपेक्षा वाढणार आहेत. महसूलमंत्र्यांनी थेट सामान्य नागरीकांसाठी जनता दरबार आयोजित करावा असा पहिलाच उपक्रम जिल्ह्याने पाहिला आहे. त्यामुळे भविष्यात ते महसूल विभागात परिणामकारक बदल घडवून ते कारभारात पारदर्शकता आणणार काय म्हणून सामान्य नागरीक अपेक्षा ठेऊन आहेत.

 

महसूल कारभारात गाव तलाठी कार्यालयापासून वरिष्ठ कार्यालयांपर्यंत कामकाज भ्रष्टाचाराचे माखले आहे. या ठिकाणी नागरीकांच्या नागरी सुविधेचा कामांऐवजी नागरीकांची महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकाराबाबत अपरिहार्यतेतेने नागरीकांचा नाईलाजाने अर्थिक व्यवहारांत शोषण करणे भाग पडावे असल्याचे चित्र सामान्यांत आहे. अर्थिक उलाढालीसह नागरीकांची अर्थिक मागण्यांसाठी ससेहोलपट थांबत नसल्याची विदारक आवस्था ही कारभारात आहे. भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे या विभागात सुरू असल्याची लाचलुचपत विभागाच्या कारवायांमुळे स्पष्ट झाले आहे.

 

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः हा जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नासंदर्भात आपली कटिबद्धता दाखवून दिली असली तरी महसूलमंत्री या परिणामकारक बदलांची महसूल दखल घेणार का मूळ प्रश्न आहे. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी महसूल विभागावर करडी नजर ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. महसूलात अनेक करप्ट अधिकारी आपले दृशकृत करतात मग ही शिक्षा सामान्यांना का ? अशी व्यवस्था निर्माण करुन अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरीकांत सातत्याने होत आहे.

 

महसूलमंत्र्यांनी बैठकीत गाव पातळीवर ते वरिष्ठ कार्यालयांपर्यंत नागरीकांची प्रकरणे गतीने सोडविण्यासहीत योग्य कालबद्धीत प्रकरणांचा निपटारा करणे, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावरील १00 दिवसांचा कालबध्द कृती आराखडा तयार करणे तसेच मंत्रालय स्तरावर ऑनलाइन दाखल प्रकरणांची माहिती मिळणार असल्याने कामांचा निपटारा करण्याची सूचना केल्या आहेत. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचेही संकेत दिल्याने या उपाययोजनांचे स्वागत होऊन अंमलबजावणी होण्याची मागणी आहे.

दर सहा महिन्यांनी जनता दरबार घ्यावा…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे विभागात पहिला जनता दरबार घेऊन महसूल अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या आहेत. या प्रयत्नामुळे सामान्य जनतेला अधिकाऱ्यांचा छळापासून न्याय मिळणार आहे. या प्रयत्नाने जिल्हास्तरावर आढावा घेऊन प्रशासनातील अडचणी व नागरीकांचे प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे महसूलीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर सहा महिन्यांनी जनता दरबार भरावा अशी मागणी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!