शेतकऱ्यांना बिबट्यांचे हल्ले, अतिवृष्टीचे प्रश्न मार्गी लावा!! खासदार अमोल कोल्हे यांची कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी


नारायणगाव : कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. “विकसित कृषी संकल्प अभियान” नारायणगाव शहरातील टोमॅटो मार्केट ते कृषी विज्ञान केंद्र पदयात्राही आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवराजसिंह चौहान यांना नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातून सुरू असलेल्या कामांची, विविध प्रकल्पांची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. तसेच, शेतकऱ्यांना बिबट्यांचे हल्ले, अतिवृष्टी, बाजारभाव यांसारख्या अनेक संकटांचा सामना करावा लागत असून आमच्या या शेतकरी बांधवांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाल्या, सध्या शेतीमध्ये अनेक बदल घडत आहेत. आपल्याला देखील बदलत्या काळानुसार शेती करावी लागणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी अनेक अडचणी देखील सांगितल्या.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिभूषण अनिलतात्या मेहेर, आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊलीशेठ खंडागळे, प्रदीप कंद, आशाताई बुचके यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!