राजीनामा राजीनामा!! लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अनेकदा अडचणीत येत आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सध्या राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत.

तसेच राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असून परिस्थिती बिकट आहे. आता हातात काहीच काम शिल्लक नसल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळत असल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे वातावरण तापले आहे. सध्या यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

रोहित पवार म्हणाले, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणारा सत्ताधाऱ्यांसाठी ‘माणिक’ असला तरी तो शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यावा आणि रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी खातं संवेदनशील मंत्र्याकडं द्यावं.

तसंच शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव हे सरकार कायमच आणतं, पण खरंच कळवळा असेल तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, भावांतर योजना, पीक विम्याचे जुने ट्रिगर पुन्हा लागू करण्याची आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता देण्याची हीच योग्य वेळ आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा उद्रेक झाला तर त्यात हे मग्रूर सरकार भाजून निघाल्याशिवाय राहणार नाही.

याशिवाय गेल्या काही महिन्यांत विविध भानगडीत अडकलेल्या, नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत असलेल्या आणि असंवेदनशीलपणे गरळ ओकणाऱ्या सर्वच मंत्र्यांच्या हाती सरकारने सरळसरळ नारळ द्यावा! अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत आता राज्यात कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!