Pune Rape Case : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध; मोबाईलमध्ये काढलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी! इतरांसोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग..
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन संबंध ठेवतानाचे मोबाईलमध्ये काढलेले व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतरांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना डेक्कन येथून समोर आली आहे. हा सर्व प्रकार आरोपीच्या घरात घडला आहे.
३१ वर्षीय तरुणीने (मुळ रा. उस्मानाबाद) शनिवारी (ता.३०) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सतिश डिकोस्टा/ऑगस्टीन पगारे (वय-४२ रा. म्हात्रे ब्रीज, डेक्कन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डेकोरेशनचे काम करतो. फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना सतीश डिकोस्टा असे नाव सांगितले. त्यानंतर डिकोस्टाने फिर्यादी यांना घरी बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने संबंध ठेवतानाचे चोरुन चित्रीकरण व न्युड फोटो त्याच्या मोबाईल मध्ये काढले.
फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. मोबाईल मधील व्हिडीओ व फोटो दाखवून ब्लॅकमेल करत मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच इतर लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास सांगून फिर्यादी यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर माझे राजकीय व्यक्तींसोबत संबंध असून तू वेश्या व्यवसाय करत असल्याचे सिद्ध करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
दरम्यान, पुढील तपास एपीआय वर्षा शिंदे करीत आहेत.