कोथरूडच्या बाई बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा!! पुण्यात लागले पोस्टर, नेमकं प्रकरण काय?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात नामांतरावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. यामुळे हा वाद सुरु झाला आहे.
असे असताना आता मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
याचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेधा कुलकर्णी यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून टीका केली आहे. आहे की, कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, असे त्यावर लिहिले आहे. यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
हे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. बाजीराव पेशवे यांचं शनिवारवाड्यात वास्तव्य होतं. त्याच शनिवारवाड्याजवळ बॅनर लागले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणाच चर्चा सुरु आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुणे आणि सोलापूर रेल्वे डिवीजनची बैठक बोलवण्यात आली होती. अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनच नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली आहे.
याबाबत भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, मी फक्त त्या मागणीची पुनरुच्चार केला. लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहित व्हावा, हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे. पुणे एक सांस्कृतीक आणि शैक्षणिक केंद्र आहे. पुणे आयटी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखलं जातं. आपला इतिहास सर्वांना माहिती झाला पाहिजे.
दरम्यान, पुण्याबरोबरच अन्य राज्यातील, शहरातील लोकांनी या शहराचा इतिहास जाणून घ्यावा” असं त्या म्हणाल्या. आता येणाऱ्या काळात हा वाद वाढणार की थांबणार हे लवकरच समजेल. मात्र याची जोरदार चर्चा मात्र सुरु झाली आहे. तसेच सोशल मीडियावर याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.