चेहऱ्यावरील रेषा, सुरकुत्या दूर करण्यासाठी उपाय…
उरुळीकांचन : चेहन्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या या तुमच्या सौंदर्याच्या शत्रू आहेत. एका सर्वेक्षणानुसार १० पैकी ४ स्त्रियांना ही समस्या सतत भेडसावत असते. स्त्रियांच्या तुलनेत ही समस्या पुरुषांना कमी जाणवते. ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे आणि साधे उपाय.
सुरकुत्या निर्माण होण्याची कारणे पुढील प्रमाणे…
चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होण्याचं कारण म्हणजे शरीरात जी विषारी द्रव्ये साठून राहतात त्यांचा निचरा होणं. ही द्रव्ये शरीरातून बाहेर पडली नाही तर ती शरीरात साठून राहतात. याशिवाय शरीरात क्षार, आम्ल आणि हार्मोन्सचं असंतुलन यामुळे सुद्धा अनेकदा चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होण्याची शक्यता असते.
गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीच्या वेळी सुद्धा अनेकदा स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येतं. यामुळे सुद्धा अनेकदा चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतात. सतत सौंदर्य प्रसाधनांचा वापर यामुळे सुद्धा अनेकदा सुरकुत्या निर्माण होतात. त्या दूर व्हाव्या यासाठी काही उपाय.
उपाय : सुरकुत्या दूर करण्यासाठी पार्लर किंवा रासायनिक घटकांचा वापर न करता नैसर्गिकरित्या सुरकुत्या कशा दूर होतील हे पाहिलं पाहिजे. यामुळे त्याचा दुष्परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाय तुमच्या आहारात फळे आणि भाज्या यांचा रस असला पाहिजे.
शहाळ्याचं पाणी यासाठी खूप लाभदायक असतं. हार्मोन्समध्ये झालेलं असंतुलन दूर करण्यासाठी तुम्ही मांसाहार करणार असाल तर मासे नक्की खाल्ले पाहिजेत. चेहऱ्यावर तुम्ही हळद, कडूनिंब, चंदन, तुळशीचं बी यांची समान मात्रेत पावडर करून कच्च्या दुधात त्याचा लेप तयार करायला हवा.
आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हा लेप लावायला हवा. साधारण तुम्ही १५ मिनिटं हा लेप लावून मग चेहरा धुण्यास हरकत नाही. यामुळे दोन ते तीन महिन्यात चेहऱ्यावरील सुरकुत्या नक्की कमी होतील.