मराठा उद्योजक तरुणांना दिलासा!! अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाला 300 कोटींचा निधी वर्ग..


पुणे : मराठा उद्योजक तरुणांना दिलासा देणार बातमी सध्या समोर आली आहे. राज्य सरकारकडून विविध महामंडळांद्वारे उद्योजक तयार करण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. मराठा समाजात उद्योजक तयार करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेलं आहे.

याबाबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अर्थकसंकल्पात 750 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भातील शासन निर्णय 15 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना 300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे तरुणांना दिलासा मिळाला आहे.

महायुती सरकारच्या या निर्णयामुळं मराठा समाजात नवे उद्योजक निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. याबाबत यासंदर्भातील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. नियोजन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 20 टक्के, 30 टक्के, 40 टक्के, 50 टक्के अशा प्रकारे निधी दिला जातो.

मिळालेला निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिल्यानंतर पुढील निधी मिळतो,याबाबत माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. मराठवाड्यात महामंडळाचं उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मराठवड्यात बीडमध्ये उपकेंद्र उभारण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचं देखील नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, शास निर्णयातील माहितीनुसार 300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळं मराठा समाजात नवे उद्योजक निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. या या निधीतून तरुण मराठा समाजातील मुलांना आर्थिक मदत केली जाते. अनेकांनी यातून आपले व्यवसाय सुरु केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!