शेतकऱ्यांना दिलासा! ९ कोटी ८० लाख जणांना किसान निधीचा १९ वा हप्ता आज जमा होणार…


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील भागलपूर येथे बटण दाबून देशभरातील ९.८० कोटी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता हस्तांतरित करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत शेतकरी काही दिवसांपासून वाट बघत होते. आज पंतप्रधानांचा भागलपूरमध्ये दुपारी २ वाजता कार्यक्रम आहे.

जिथून ते २००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. याबाबत कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, भागलपूरमध्ये देशव्यापी किसान सन्मान समारोह आयोजित केला जात आहे. या परिषदेत, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये पाठवतील.

पंतप्रधान किसान योजनेच्या शेवटच्या १८ व्या हप्त्यात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०,६६५ कोटी रुपये दिले आहेत. आज २४ फेब्रुवारी रोजी, १९ व्या हप्त्यात सुमारे ९.८० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे २२,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील, असेही ते म्हणाले. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

या निधीतून आतापर्यंत ९ कोटी ६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले आहेत. यावेळी सुमारे ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली जाईल. सुमारे २.५ कोटी शेतकरी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने सामील होतील. यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी मोठा दिवस आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी लहान शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आणि त्यांना व्याजदराने कर्ज घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या. या निधीतून शेतकरी शेती संबंधित आवश्यक खर्च भागवतात, असेही त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!