Ravindra Dhangekar : पुण्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?


Ravindra Dhangekar : पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी सहकारनगर परिसरात मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असून पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. तसंच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ निर्माण झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली होती. जवळपास मध्यरात्रीपर्यंत गोंधळ सुरू होता.

पोलीस स्थानकाबाहेर मतदानाच्या आधी असा गोंधळ सुरू झाल्यामुळे एकप्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील याची गंभीर दखल घेऊन, जो कायदाने सुव्यवस्था बिघडवेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. Ravindra Dhangekar

कलम १४३, १४५, १४९, १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५. लोकप्रतिनीधी अधिनियम १९५१ कलम १२६ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहीतेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून व घोषणा देवून आदेशाचं उल्लंघन करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

त्यानंतर आज रवींद्र धंगेकर यांच्यासह४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा धंगेकरांनी घेतला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!